रविवार, नोव्हेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१० लाखांपेक्षा कमी किंमतीत ७ सीटर कार हवीय? हे आहेत बेस्ट पर्याय

सप्टेंबर 11, 2022 | 5:24 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात प्रत्येकालाच आपले स्वतःचे वाहन अर्थात कार असावी असे वाटते. परंतु त्या आपल्या बजेटमध्ये असाव्यात, आकर्षक दिसाव्यात आणि मायलेजमध्ये देखील चांगले असाव्यात, असे वाटत असते. साहजिकच अशा प्रकारच्या काही कारची चांगली मागणी दिसून येत आहे. सध्या याच गाड्यांची क्रेझ असल्याचेही मार्केटमध्ये आढळून आले आहे, त्यातच कार मार्केटमध्ये चांगला स्पेस आणि अधिक आसनक्षमता असलेल्या ७-सीटर कारची मागणी सातत्याने वाढत आहे. मोठ्या फॅमिलीसाठी ७-सीटर कार उत्तम ठरतात. पण, देशात सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सध्या कार खरेदी करताना ग्राहक मायलेजचाही तितकाच विचार करता आहे, त्यामुळे कमी किंमतीत-जास्त स्पेस सोबतच परवडणारा मायलेज असलेल्या कारला ग्राहक जास्त पसंती देत आहेत.

आपली फॅमिली जर मोठी असेल आणि कमी किंमतीत मायलेजच्या बाबतीतही परवडणारी ७-सीटर कार खरेदी करण्याचा विचार असेल, पण कुटुंब मोठे असेल, तर एकत्र लांबच्या सहलीला जायचे असेल तर तुमचे संपूर्ण कुटुंब एकाच गाडीने एकत्र जावे अशी तुमची इच्छा असेल. जर तुम्हालाही ही इच्छा पूर्ण करायची असेल पण तुमचे बजेट कमी आहे, काही प्लॅन असेल तर आज आम्ही तुम्हाला भारताच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या १० लाखांपेक्षा कमी किंमतीतील ५ शानदार ७-सीटर एसयूव्ही-एमपीव्ही कारबाबत आपण जाणून घेणार आहोत.

 मारुती सुझुकी एर्टिगा :
पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कार पेट्रोलवर २०.५१ किमी/प्रतिलीटर आणि सीएनजीवर २६.११ किमी/किलो मायलेज देते. या कारचा मेंटेनन्स खर्च खूपच कमी आहे. तसेच याचे अनेक व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. Maruti Suzuki Ertiga ही सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी MPV कार आहे. ही MPV भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि CNG या दोन्ही आवृत्त्यांमध्ये येते. यामध्ये SHVS माइल्ड हायब्रिड सिस्टिमसह १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०३bhp पॉवर आणि १३८Nm टॉर्क जनरेट करते. यात ४-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. तर, CNG व्हर्जनमध्ये १.५L इंजिन आहे, जे ९१bhp पॉवर आणि १२२Nm टॉर्क जनरेट करते. यासोबत ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. या ७ सीटर कारची एक्स-शोरूम किंमत ८.४१ लाख रुपये आहे.

रेनॉल्ट ट्रिबर :
रेनॉल्टच्या या कारमध्ये १.०L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे बाजारात एकूण दहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारला NCAP कडून ४ स्टार सुरक्षा रेटिंग देखील आहे. कार फ्रेंच ऑटोमेकर कंपनीची भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त ७-सीटर कारपैकी एक आहे. नवीन २०२१ Renault Triber एमपीव्ही चार व्हेरिअंट्समध्ये येते. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या व्हेरिअंट्सचा पर्याय आहे. कंपनीने या एमपीव्हीमध्ये १.० लिटर क्षमतेचं ३-सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन दिलं आहे, या इंजिनसोबत ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. हे इंजिन ७० bhp पॉवर आणि ९६ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याचप्रमाणे
या कारची एक्स-शोरूम किंमत ५.९१ लाख रुपये आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

महिंद्रा बोलेरो निओ :
महिंद्रा बोलेरोचा ही स्पेशल व्हेरिएंट आहे. या ७ सीटर कारला १७.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रियर पॉवर विंडो, पॉवरफुल एसी, ऑटोमॅटिक डोअर लॉक, EBD, ABS, ISOFIX चाइल्ड सीट्स, प्रशस्त बूट स्पेस, फॅब्रिक सीट्ससह इटालियन इंटिरियर्स मिळतात.महिंद्राने अलीकडेच Mahindra TUV300 मॉडेलचे फेसलिफ्ट व्हर्जन म्हणून नवीन Mahindra Bolero NEO लाँच केलीये. महिंद्रा बोलेरो नियोमध्ये १.५-लिटर mHawk डिझेल इंजिन दिले असून हे इंजिन १०० पीएस पॉवर आणि १६० एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनसोबत ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. कंपनीने नवीन बोलेरोमध्ये टीयूवी300 प्रमाणे फ्युअल सेविंग इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजी देखील दिली आहे. एअरबॅग्ज सारखी उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या वाहनाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.२९ लाख रुपये आहे.

महिंद्रा बोलेरो :
महिंद्राच्या अत्यंत लोकप्रिय ७ सीटर कारमध्ये १.५L, ३-सिलेंडर, mHawk ७५ डिझेल इंजिन आहे. एअरबॅग्ज, एबीएस, म्युझिक सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि डिजिटल क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये या वाहनात उपलब्ध आहेत. ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. २००० मध्ये लाँच झाल्यापासून, कंपनीने १३ लाखापेक्षा जास्त कार विकल्या आहेत. बोलेरो एसयूव्ही ३ व्हेरिअंट्समध्ये येते, ज्यात B4, B6 आणि B6 Opt समाविष्ट आहे. कंपनीने बोलेरोमध्ये १.५-लिटर mHawk75 डिझेल इंजिन दिले असून हे इंजिन ७५bhp पॉवर आणि २१०Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.या कारची एक्स-शोरूम किंमत ९.८५ लाख रुपये आहे.

किआ कारेन्स :
Kia Carens ला १.५L, CRDi VGT डिझेल, Smartstream १.४-L T-GDi पेट्रोल आणि Smartstream १.५-लीटर पेट्रोल सारख्या तीन इंजिनांचा पर्याय मिळतो. या वाहनाचे ५ व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. यात 7-स्पीड DCT, ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे तीन पर्याय आहेत. या कारची किंमत ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

डॅटसन गो प्लस :
ही भारतातली सर्वात स्वस्त ७-सीटर कार आहे. ही कार एकूण ५ व्हेरिअंट्समध्ये येते, जपानच्या कंपनीने नवीन दॅटसन गो प्लसमध्ये १.२ लिटर क्षमतेचं ३-सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन दिलंय या इंजिनसोबत दॅटसन गो प्लसमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन गिअरबॉक्स मिळतात. Datsun Go Plus मॅन्युअल व्हेरिअंटमधील इंजिन ६८PS पॉवर जनरेट करते, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिअंट ७७PS ची पॉवर आणि १०४Nm टॉर्क जनरेट करते. कारचा व्हीलबेस २४५० mm आणि ग्राउंड क्लीअरन्स १८० mm असून, शिवाय पेट्रोल टाकी क्षमता ३५ लिटर आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत भारतात फक्त ४.२५ लाख रुपयांपासून सुरू होते, तर ६.९९ लाख रुपयांपर्यंत टॉप व्हेरिअंटची किंमत जाते.

7 Seater Car Below 10 Lakh Rupees Best Options
Automobile

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सार्वजनिक क्षेत्रातील बँका उघडणार ३०० नवीन शाखा; तरुणांना मिळणार नोकऱ्याच नोकऱ्या

Next Post

विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात माहितीय का?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
google search

विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात माहितीय का?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011