मुजफ्फरपूर (बिहार) – प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम बंधन अतुट असेल तर त्यांना कोणीही अडवू शकत नाही. बिहारच्या मुजफ्फरपुर भागात एक अशीच अनोखी घटना घडली. सात महिन्यांची गर्भवती तरूणीचा जात पंचायतीने विवाह लावून दिला आहे. कारण, तिचा प्रियकर तिला फसवू पाहत होता. पंचायतीने तरुणीचे हित लक्षात घेऊन संबंधित प्रियकराशी लग्न लावून दिले.
प्रेमाच्या आणाभाका घेऊन अनेक दिवस प्रेमसंबंध आल्यानंतर प्रियकर आपल्या गावी निघून गेला. त्याच्या प्रेमाचा अंकुर तिच्या पोटात वाढत होता. खूप वाट पाहिल्यानंतर ती अखेर प्रियकराच्या गावी पोहोचली आणि तिने तेथील गावकऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर, पंचायत बसली आणि ग्रामस्थांनी ती तरूणी आणि प्रियकराच्या कुटुंबासह चर्चा केली.
यानंतर त्यांनी विरोध न करता या दोघांचे लग्न करण्याचा निर्णय पंचायतीत घेण्यात आला. यापुर्वी देवरिया पोलिस ठाण्यातील दोन वेगवेगळ्या गावांमधील पंचायतीच्या लोकांमध्ये या लग्नाविषयी बर्याच चर्चा झाल्या. या दोघांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. तसेच, तरूणी सात महिन्यांपासून गरोदर राहिली होती. अखेर दोघांचा विवाह झाल्याने गावापरिसरात आनंदाचे वातावरण आहे.