मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगर – मनमाड महामार्गावर असलेल्या राहुल सर्व्हिस स्टेशनच्या गोडवून मध्ये येथील कामगारांना अतिशय विषारी दुर्मिळ ब्लॅक कोब्रा नाग आढळून आला. सदरचा नाग हा सात फुटी लांबीचा आणि मोठा असल्याने येथील कामगारांची भंबेरी उडाली. त्यांनी तात्काळ परिसरातील सर्पमित्र गोविंद शिंदे यांना फोनवरून ही माहिती दिली. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या ब्लॅक कोब्रा नागास पकडले. त्यानंतर नागाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.