नाशिक – डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या भूमी अभिलेखांच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 7/12 ई-फेरफार ऑनलाईन करून देण्याचे नाशिक जिल्ह्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावातील एकूण 12 लाख 53 हजार 127 सर्व्हे क्रमांकांपैकी पैकी 12 लाख 51 हजार 994 सर्व्हे क्रमांकांच्या विसंगती दुरुस्त करून त्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना या सातबारा व ई-फेरफार नोंदी महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार, महाभुमी संकेतस्थळाच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या लिंकवर पाहण्यासाठी व त्यांच्या नकला डाउनलोड करण्यासाठी http://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आल्याने या सेवेचा लाभ नागरिकांना घरीच्या घरी घेता येणार आहे. या उपक्रमांतर्गत 2016 पासून ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेले सर्व फेरफार देखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच एकूण सर्व्हे क्रमांकापैकी उर्वरित एक हजार 133 सातबाऱ्यांमधील विसंगती दुरुस्त करून लवकरच त्याही ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला सातबारा विशेष मोहिमेद्वारे अद्यावत करून ऑनलाइन करण्याचा उपक्रम आज आपल्या जिल्ह्यात 99% चा टप्पा पार करून पुढे गेला आहे ही खूप समाधानाची बाब आहे.
सर्वांनी यासाठी खूप कष्ट घेतले त्यांचे अभिनंदन! याचाच पुढचा टप्पा म्हणून सातबारा वरील पोकळीस्त नोंदी दूर करण्याची देखील विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
—
अशा आहेत तालुनिहाय नोंदी
तालुका | एकूण सर्वे क्रमांक | एकूण विसंगती दूर करणेत आलेले सर्व्हे क्रमांक | एकूण विसंगती सर्व्हे क्रमांक | शिल्लक कामाची टक्केवारी |
नाशिक | 221055 | 220821 | 234 | 0.11 |
सुरगाणा | 29221 | 29213 | 8 | 0.03 |
त्रिंबक | 35359 | 35359 | 0 | 0.00 |
इगतपुरी | 80415 | 80324 | 91 | 0.11 |
सिन्नर | 106801 | 106624 | 177 | 0.17 |
निफाड | 107960 | 107859 | 101 | 0.09 |
येवला | 69375 | 69299 | 76 | 0.11 |
कळवण | 44053 | 44044 | 9 | 0.02 |
देवळा | 40660 | 40636 | 24 | 0.06 |
बागलाण | 96019 | 95982 | 37 | 0.04 |
मालेगाव | 190040 | 189815 | 225 | 0.12 |
नांदगाव | 67747 | 67644 | 103 | 0.15 |
चांदवड | 79874 | 79861 | 13 | 0.02 |
दिंडोरी | 65255 | 65220 | 35 | 0.05 |
पेठ | 19293 | 19293 | 0 | 0.00 |
एकूण | 1253127 | 1251994 | 1133 | 0.09 |