कळवण – कळवण तालुक्यातील चणकापूर धरणापासून येणारा उजवा कालवा दुरुस्तीच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्यामुळे पाटामधील पूर पावसाचे पाणी हे नाल्या द्वारे निघून ६० ते ७० एकर जमीनीत शिरल्यामुळे द्राक्ष बाग मका टोमॅटो कोबी तुर व काकडी असे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे बहुतांश कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे संबंधित ठेकेदारावर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सविस्तर असे की, कळवण शहरालगत गेल्यावेळचा पावसाळ्यात याच कालव्याला येथेच भले मोठे भगदाड पडले होते. ते दुरुस्तीचे कामाचे नियोजन व्यवस्थित झाले नसल्याने सदर काम हे एप्रिल ते मे महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होते. परंतु पाटबंधारे अधिकाऱ्यांनी त्या कामाचे सुरुवात २८ जूनला काम सुरू केले. तेव्हा संबंधित ठेकेदाराने कालव्याचेचे काम दोन दिवस मशिनीच्या साह्याने खोदून ठेवला. परंतु पुढील दहा ते बारा दिवस काम बंद होते. परत त्यांनी कुठलेही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे गेल्या चार दिवसापासून तालुक्यात सततधार पावसामुळे सर्व नाल्यांना पूर आल्यामुळे डोंगरावरील वाहणारे पाणी हे कालव्यात न जाता नाल्याला निघण्यासाठी जो पाईप टाकून ठेवला होता. तो कोरून ठेवल्यामुळे सदर २२ किलोमीटरचे डोंगर नाल्यांवरून वाहणारे पाणी हे त्या पाटाद्वारे जाते. परंतु ठेकेदार व पाटबंधारे अधिकारी यांनी पावसाळ्याचे पूर पाण्याचे नियोजन न करता हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे पिकांना मोठी हानी झाली आहे. कारण २०० ते २५० व्यूसेस इतक्या वेगाने वाहणारे पाणी त्या कालव्याला जात होते. तेव्हा सदरच्या पाईपातून निघणारे पाणी हे शेतीतून पाण्याबरोबर वाळू माती वाहून घेत पूर्णपणे काही घरांमध्ये तर राजेन्द्र शिंदे यांच्या द्राक्षेच्या बागेमध्ये पाणी साचल्याने २५ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले.
सदरील जागेवर तहसीलदार बंडू कापसे यांनी पहानी केली तेव्हा येथील शेतकरी राजेंद्र शिंदे, रामकृष्ण पगार, निळा पगार, जयेश शिंदे, अशोक शिंदे, ललित शिंदे, संतोष पगार सह आदी शेतकरी उपस्थित होते.