इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अवघ्या ६ वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे ही दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी किशनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चिमुकला काँग्रेस नेत्याचा मुलगा आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिगदंबर गावातील काँग्रेस नेते विजेंदर सिंह चौहान यांचा भाऊ जितेंद्र सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा हर्षू याची हत्या झाली. आरोपींनी मुलाच्या बदल्यात चार कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
इंदूरमधील महू येथील काँग्रेस नेत्याच्या पुतण्याची अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती, प्रत्यक्षात आरोपींनी अपहरणासाठी ४ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात सध्या सीसीटीव्हीच्या आधारे २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिगदंबर गावातील काँग्रेस नेते विजेंद्र सिंह चौहान यांचा भाऊ जितेंद्र सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा हर्षू याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी अपहरण केले होते.
याप्रकरणी आयजी राकेश गुप्ता म्हणाले की, यातील एक आरोपी रितेशचे घर मुलाच्या वडिलांनी बांधले होते. मुल त्याच्या घरातच खेळत असे. आरोपी रितेशने मुलाला मारायचेच ठरवले होते. खंडणी मिळाली असती तरी तो मुलाला ठार करणारच होता. कारण, मुलाने त्यांच्याबद्दल सर्व काही घरी सांगितले असते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हर्षूचे घराजवळून अपहरण करण्यात आले. बलवाडाजवळील बाई गावात पोलिसांना मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सापडले, ज्यामध्ये तो निघताना दिसत होता. यासोबतच पोलिसांना एका कारचे फुटेजही मिळाले आहे. खरगोन आणि किशनगंज पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
6 Year boy Kidnapped Killed Crime Madhya Pradesh