रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काय सांगता! पेट्रोल-डिझेल वाहनांची निर्मिती बंद; या ६ कंपन्यांनी केली घोषणा

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 2:22 pm
in संमिश्र वार्ता
0
car production

नवी दिल्ली – सध्याच्या घडीला भारतासह जगभरात पेट्रोल आणि डिझेल वाहनांची मोठी चलती आहे. त्यातच नवनवीन वाहने बाजारात येत आहेत. अशातच तब्बल ६ दिग्गज कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे.

पृथ्वीवर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढत असल्याने अनेक ठिकाणी त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हवेच्या प्रदूषणाने यात भर पडत असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी कारनिर्मित्या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सहा मोठ्या कार निर्मिती करणार्या कंपन्या आगामी काळात डिझेल-पेट्रोल वाहनांची निर्मिती बंद करण्याच्या तयारीत आहेत. जागतिक पातळीवरील या सहा कंपन्यांमध्ये भारतीय टाटा समुहाच्या जॅग्वार लँड रोव्हर या कंपनीचाही समावेश आहे.

या कंपन्यांचा सहभाग
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, स्वीडनची वॉल्व्हो, अमेरिकेची फोर्ड, जनरल मोटर्स, डायमलर एजी ची मर्सिडिज बेंझ, चीनची बीवायडी आणि टाटा मोटर्सची जॅग्वार लँड रोव्हर या कंपन्या ग्लासगो येथे एका शपथपत्रावर स्वाक्षरी करणार आहेत. ही स्वाक्षरी मोहीम २१ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हवामान बदलाला नियंत्रित करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. त्याअंतर्गत कंपन्यांतर्फे २०४० पर्यंत जीवाश्म इंधनांवर चालणार्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

दोन कंपन्यांचा नकार
जगातील अग्रक्रमावर असलेल्या दोन कंपन्यांनी या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिल्याने मोहिमेला धक्का लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टोयोटा मोटर कॉर्प आणि फॉक्स व्हॅगन एजी या दोन कंपन्या या मोहिमेत सहभागी होणार नाहीत. तसेच सर्वात मोठी कारची बाजारपेठ समजल्या जाणार्या अमेरिका, चीन आणि जर्मनीने सुद्धा या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे.

अमेरिका, चीन असहमत
सीओपी (कॉप) २६ समिटचे आयोजक ब्रिटनने दिलेल्या माहितीनुसार, २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याच्या मोहिमेअंतर्गत नव्या वाहनांची निर्मिती न करण्याच्या मुद्दयावर चार देशांनी असहमती दर्शविली आहे. यामध्ये न्यूझीलंड, पोलंड, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. या देशांनी असहमती दर्शविल्याने या मोहिमेच्या यशाबद्दल आता शंका व्यक्त करण्यात येत आहे.

या कंपन्याही मोहिमेपासून दूरच
जगातील चौथी सर्वात मोठी कार कंपनी स्टेलांटिस, जापानची होंडा आणि निस्सान, जर्मनीची बीएमडब्ल्यू आणि दक्षिण कोरियाची ह्युंदई या कंपन्याही स्वाक्षरी करण्यापासून दूरच राहिल्या आहेत. रायडिंग हेलिंग कंपनी उबर या मोहिमेचा भाग बनू शकते. इलेक्ट्रिक कारना तसेच शून्य उत्सर्जन करणार्या वाहनांना प्रोत्साहन देणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – डॅाक्टर पतीसह सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ; सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

अमिताभ यांच्या घरातील या बैलाच्या पेंटिंगची किंमत किती आहे माहितीय का?

Next Post
amitabh family

अमिताभ यांच्या घरातील या बैलाच्या पेंटिंगची किंमत किती आहे माहितीय का?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011