विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आता लोक छोट्या ऐवजी मोठ्या कारमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचे कारण म्हणजे संपूर्ण कुटुंब एका मोठ्या कारमध्ये सहज बसू शकते, आणि कोरोना व्हायरस संसर्गापासून प्रतिबंध होत आहे. तसेच आपण कुटुंबासमवेत एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सुरक्षित प्रवास करू शकता.
गेल्या काही महिन्यांत कारच्या किंमतीत बरीच वाढ झाली असली तरी मोठ्या एमपीव्ही कार खरेदीसाठी आणखी पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत बजेटमध्ये असेल आणि 7 ते 8 जण बसतील अशा स्वस्त फॅमिली कार भारतातील बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
१) मारुती सुझुकी इको:
मारुती इकोमध्ये 1196 सीसीचे 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. याचे इंजिन 6000 आरपीएमवर कमाल 54 केडब्ल्यू आणि 3000 आरपीएमवर 101 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मारुती सुझुकी इको 7 सीटरची किंमत 3,55,205 रुपये इतकी आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त स्टाइलिश हॅचबॅक कार आहे.
२) रेनॉल्ट ट्रायबर
रेनॉल्ट ट्रायबर मध्ये 1.0 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 72 पीएस आणि 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रायबरमध्ये स्पीड व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येत आहे. या कारची किंमती 4 लाख 95 हजारपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ट्रायबर सीएमएफ-ए प्लस प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे. ट्रायबर उत्कृष्ट बसण्याच्या जागेसह 625 लिटर बूट स्पेस देखील देते.