विशेष प्रतिनिधी, मुंबई
दूरसंचार विभागाने भारतात 5G ट्रायलसाठी टेलिकॉम आपरेटर्सला स्पेक्ट्रम वाटपाचे काम सुरु केले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलोर, गुजरात, हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये 5जी चे ट्रायल होणार आहे.
टेलिकॉम आपरेटर्सला पंजाब, हरियाणा आणि केंद्र शासीत प्रदेश चंदिगढसाठी स्पेक्ट्रम वितरित करण्यात आले आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आपरेटर्सला 700 Mhz बँड, 3.3-3.6Ghz बँड और 24.25-28.5 Ghz बँड चे स्पेक्ट्रम वेगवेगळ्या लोकेशनच्या अनुशंगाने वितरित करण्यात आले आहे.
४ मे ला दूरसंचार विभागाच्या वतीने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल यांच्या अर्जाला 5G ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली होती. याचदरम्यान कुठल्याही चीनी कंपनीच्या मदतीशिवाय हे ट्रायल करावे लागेल, अशी अट दूरसंचार विभागाने टाकली. रिलायन्स जिओ इन्फोकॉम आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर 5G चे ट्रायल घेणार आहे. दूरसंचार विभागाने या ट्रायलसाठी एरिकसन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT सारख्या टेलिकॉम कंपन्यांना देखील मंजुरी दिली आहे.
4Gपेक्षा दहापट स्पीड
5G टेक्नॉलॉजी 4G पेक्षा दहापटीने जास्त स्पीड देते. तसेच स्पेक्ट्रम इफिशियंसीदेखील तीन पटींनी जास्त असेल. ट्रायलदरम्यान अॅपच्या आधारावर टेस्टिंग घेतले जाईल. 5G टेक्नॉलॉजी ट्रायलमध्ये टेलिमेडिसीन, टेली–एज्युकेशन आणि ड्रोन बेस्ड अॅग्रीकल्चर मॉनिटरींगची क्षमताही तपासली जाईल. यावेळी टेलिकॉम कंपन्या आपल्या विविध डिव्हाईसचेही टेस्टिंग करून घेतील. या ट्रायलसाठी जास्तीत जास्त ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.