सप्तशृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी ५५ हजार भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सांबरे यांनी सपत्नीक केली. प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड चे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी देसाई, धर्मादाय सहआयुक्त तुफानसिंग अकाली, जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ आदी प्रत्यक्ष पूजेत सहभागी झाले.
सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रसंगी मा. नामदार डॉ. विजय गावित, महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहा पोलीस अधीक्षक खांडवी, विश्वस्त व तहसिलदार बंडू कापसे, विश्वस्त ऍड. श्री. दिपक पाटोदकर, एन. डी. गावित, माजी मंत्री आनंदराव आडसुळ यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होती.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १२ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, लेखापाल भरत शेलार, भक्तनिवास सहा विभागप्रमुख शाम पवार, प्रसादालाय पर्यवेक्षक प्रशांत निकम, सह पर्यवेक्षक रामचंद्र पवार, उपकार्यालाय प्रमुख गोविंद निकम, मंदिर विभाग सहा प्रमुख नारद आहिरे, सह पर्यवेक्षक सुनील कासार, सह पर्यवेक्षक विश्वनाथ बर्डे, धर्मार्थ रुग्णालय प्रमुख डॉ. धनश्री धोडकी, विद्युत विभाग प्रमुख जगतराव मुदलकर, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख व वाहन विभाग प्रमुख संतोष चव्हाण तसेच सर्व ट्रस्ट कर्मचारी, पुरोहित वर्ग, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, रोपवे व्यवस्थापक राजू लुम्बा यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.