दिंडोरी : कादवा कारखान्याचे भरभराटीसाठी कामगारांचे मोठे योगदान राहिले आहे. आज काळानुरूप बदल करावे लागत असून केवळ साखर निर्मिती करत साखर कारखाने चालू शकत नसल्याने केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. कादवानेही इथेनॉल प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सभासदांसोबतच कामगार ही ठेवी देत असल्याने हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून या प्रकल्पासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन कारखान्याचे संचालक बापूसाहेब पडोळ यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांनी ठेवी ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी व कामगारांनी ठेवी देत प्रतिसाद दिला. पुढे बोलताना शेटे यांनी कारखान्याची वाटचाल विशद केली. १४ वर्षांपूर्वी कारखान्याची बिघडलेली आर्थिक घडी पाहता कोणतीही बँक कर्ज देत नव्हती. त्यावेळी अनेक सभासद कार्यकर्त्यांनी पतसंस्थेत ठेवी दिल्या म्हणून कारखाना सुरू होऊ शकला. टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण विस्तारीकरण करण्यात आले. काळाची पावले ओळखत गाळप क्षमता वाढवली असून अजूनही जादा गाळप क्षमता परवानगी घेऊन ठेवली जाणार आहे.
साखरेला भाव व उठाव नसल्याने मोठ्या आर्थिक संकटातून साखर उद्योग जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर भर देत काही सवलती देऊ केल्या आहे. कादवा ने ही हा प्रकल्प हाती घेतला आहे मात्र या प्रकल्पासाठी काही स्वनिधी आवश्यक असून आपण सभासदांना ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. त्यास सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सभासदा बरोबरच बिगरसभासद ठेवी ठेवत आहे. कामगार ही उस्फूर्तपणे ठेवी ठेवत असून सर्वांनी यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. पुढील हंगाम लवकर सुरू होणार असून त्यादृष्टीने तयारी करत पुढील हंगाम विक्रमी गाळप करण्याचे तयारीला लागावे असे आवाहन शेटे यांनी केले.
कामगार संचालक तथा कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांनी यावेळी सर्व कामगार हे कारखान्याचे हितासाठी अहोरात्र परिश्रम घेत असून कामगार एक महिन्याचा पगार ठेव म्हणून ठेवणार असून त्यासोबतच ज्यांना शक्य आहे. ते कामगार अधिक ठेवी ठेवत इथेनॉल प्रकल्प उभारणीत आपला सहभाग नोंदवतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्हा चेअरमन उत्तमबाबा भालेराव जेष्ठ सभासद दामोदर शेळके,राजाराम सोनवणे,त्र्यंबक संधान,मधुकर गटकळ,विश्वनाथ देशमुख,दिनकर जाधव,शहाजी सोमवंशी,बाळासाहेब जाधव,सुनील केदार,शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव,सुभाष शिंदे,रामदास पाटील, नामदेव घडवजे,युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे,संपतराव कोंड रघुनाथ जाधव,सल्लागार बाळासाहेब उगले,जे एल शिंदे,मुख्य अभियंता विजय खालकर,चीफ केमिस्ट सतीश भामरे,सचिव राहुल उगले,लेखापाल सत्यजित गटकळ,युनियन सरचिटणीस संतोष मातेरे सर्व युनियन पदाधिकारी, आदींसह सर्व अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार कार्यकारी संचालक हेमंतराव माने यांनी मानले.