इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात ही दुर्घटना झाली आहे. मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने ५० हून अधिक जण पायरीच्या विहिरीत पडले. त्यातील २५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अन्य जणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि १०८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. काही लोकांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर विहिरीत पडलेल्या लोकांचे नातेवाईक अस्वस्थ आहेत. आतापर्यंत दहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 11 महिला आणि 1 पुरुष आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या अॅपल रुग्णालयात आणण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. मात्र, पाणी कमी होते, त्यामुळे खाली पडल्यानंतरही लोक आत उभे असल्याचे दिसून आले. मात्र एकावर एक पडल्याने लोक जखमी झाले आहेत.
इंदूरचे जिल्हाधिकारी इलैया राजा यांनी सांगितले की, १९ जणांना वाचवण्यात आले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कडक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल.
Madhya Pradesh | 25 people trapped after a stepwell at a temple collapsed in the Patel Nagar area in Indore.
Ten people have been rescued from the stepwell and rushed to hospitals. pic.twitter.com/FpCzxUVVJp
— PB-SHABD (@PBSHABD) March 30, 2023
लोकांनी सांगितले की, ज्या विहिरीत लोक पडले आहेत त्यामध्ये सुमारे 10 फूट पाणी भरले आहे. लोक पडले, त्यावरून ढिगारे पडले. त्यामुळे खाली पडलेल्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. प्रशासन आता पायरीचे पाणी कमी करण्याची तयारी करत आहे. यानंतर, पडलेल्या लोकांचा पुन्हा शोध घेतला जाईल. टीमने दिसत असलेले सर्व मृतदेह बाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे.
वास्तविक, मंदिरातच एक पायरी विहीर आहे, ज्याचे छत अचानक कोसळले. त्यावेळी मंदिरात हवन चालू होते. बाल्कनीत लोक बसले होते. यादरम्यान छत कोसळले. हवनामुळे गर्दीही जास्त होती. त्यामुळे ५० हून अधिक जण विहीरीत पडले. स्थानिकांनी तत्परता दाखवत सुमारे दहा जणांना बाहेर काढले ही दिलासादायक बाब आहे.
शोध व बचावकार्य काही घेतले असले तरी अरुंद गल्ल्या आणि मंदिराच्या ठिकाणी असलेली कमी जागा यामुळे बचावकार्यात चणी येत असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाचा मोठा ताफा घटनास्थळी पोहचला आहे.
VIDEO | Roof of old stepwell collapses in a temple in Indore; 25 people feared to fall (Disturbing visuals). More details awaited. pic.twitter.com/v3cuokzsks
— Press Trust of India (@PTI_News) March 30, 2023
50 Peoples Fall into Stepwell Indore Temple Rescue Operation