मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आज सकाळीच अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओक्के…. अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विरोधक आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने विधिमंडळाचा परिसर दणाणून गेला.
https://twitter.com/Marathi_Rash/status/1559774078482862081?s=20&t=xknhBZbaK10K35-haw7ETQ
50 Khoke Ekdam Ok Opposition MLA Shouting
Maharashtra Monsoon Assembly Session