नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या विकासासाठी शासन –सार्वजनिक –खासगी भागीदारी या त्रिसुत्रीनुसार विकास व्हावा असे सुचविणारे पुढील २५ वर्षांचा रोड मॅप असलेले व्हिजन डॉक्युमेंट एनएमआरडीएकडे मी नाशिककर तर्फे सोपविण्यात आले. एनएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .माणिक गुरसाळ यांच्या जाहीर सुचनेनुसार हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. मी नाशिककरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठेकर व आयआयएमएचे सीएसओ कबीर सुभेदार यांनी या ७७ पानी रोड मॅपचे सादरीकरण एनएमआरडीएचे उपसंचालक दीपक वराडे व नियोजन अधिकारी दिव्यांक सोनवणे यांच्याकडे केले.
रोड मॅप ची ठळक वैशिष्ट्ये –
1)नाशिकच्या भविष्यकालीन विकासासाठी एनएमआरडीए आवश्यक पायाभूत सुविधांसह योग्य नियोजन कसे करू शकते याचा उहापोह
2)मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता
3)नाशिक 3.0 अंतर्गत शाश्वत व संतुलित विकास – यात इको ग्रीन आणि धार्मिक पर्यटन ,वाईनरी आणि कृषी निर्यात ,रिंग रोग कनेक्टीव्हिटी,एसटीपीआय आणि खाजगी आयटी पार्क ,आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पर्यटन ,खाजगी विद्यापीठे ,रोजगार निर्मिती ,नाशिकचे ब्रँडिंग आदी नाशिकच्या विकासाला चालना देणाऱ्या मुद्द्यांचा समावेश
तसेच पुढील बाबींचा सारांश आहे-नाशिकच्या विकासाचे विजन /अंमलबजावणीचे टप्पे / प्रक्रिया / कृती / भागधारक योजना / नोकऱ्या / तयार पायाभूत सुविधा / पायाभूत सुविधांचे अपग्रेड / भविष्यकालीन वाढ
4)सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने, मी नाशिककरतर्फे सिंहस्थ कनेक्ट टुरिझम प्लॅन राबविणार आहे .यात हवाई आणि रस्तेमार्गांच्या कनेक्टेड पॅकेजेससह पर्यटकांना नाशिकमधील जास्तीत जास्त पर्यटन स्थळांना व धार्मिक स्थळांना भेट देता येईल
5)1 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
6)नाशिकचे रँकिंग सुधारणार
एनएमआरडीए आणि जिल्हा विकास योजनेला पाठिंबा देण्यासाठी, विकसित भारत अंतर्गत मी नाशिककर नाशिक@२०३० पीपीपी रोड मॅप अंतर्गत संपूर्ण भारतातील सल्लागार संघटनांसह पुढील प्राधान्यक्रमांवर काम करत आहे. या प्राधान्यक्रमांना बी२बी बैठकी अंतर्गत समाविष्ट केले आहे
1). भारतातील टॉप 14 महानगरांमध्ये नाशिकचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग
2). तयार पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या आयटी कंपन्या आणि आयटी इन्फा बिल्डिंग कंपन्यांना नाशिकमध्ये आमंत्रित करणे
3) फ्रेमर्ससह कृषी प्रक्रिया उद्योग उपक्रमांद्वारे नाशिकच्या कृषी निर्यात वाढीला चालना देणे.
4) मोठे भूखंड राखीव ठेवण्यासाठी आणि CII FACCI, ASHOMA सोबत समन्वय साधण्यासाठी मदर इंडस्ट्रीजसाठी एमआयडीसीशी लॉबिंग करणे.
5) रिंग रोड – मी नाशिककरने अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा 137 किमी 4 मीटर रुंद व्हिलेज रोड बाह्य रिंग रोड म्हणून सामायिक केला आणि तयार केला आहे. सिंहस्थ प्रसंगी सरकारने तो अंशतः सर्वात व्यवहार्य मानला आहे.
मी नाशिककरच्या या व्हिजन डॉक्युमेंटला एनएमआरडीएने सकारात्मक प्रतिसाद दिला.
याबाबत अधिक माहिती देताना संजय कोठेकर म्हणाले नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी आणि नाशिकला भारतातील एक प्रमुख महानगर बनवण्याच्या वाटचालीसाठी मी नाशिककर नेहमीच तत्पर आहे.