मुंबई – स्मार्ट गुंतवणूकदार म्हणजे ज्याला एका रात्रीत भरपूर पैसा कसा कमवायचा ते माहीत असते तो नाही. त्यापेक्षा, जो सातत्याने गुंतवणूक करत राहण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा उपयोग करू शकतो, ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असतो आणि जो दीर्घकाळात संपत्तीचा संचय करतो, तो स्मार्ट गुंतवणूकदार. आणखी एक मुद्दा म्हणजे, सगळे जण जेथे पैसा गुंतवत आहेत, तेथे स्मार्ट गुंतवणूकदार गुंतवत नाहीत, त्याऐवजी ते बाजाराबद्दल जाणून घेतात आणि कशातही पैसा गुंतवण्यापूर्वी बरेच संशोधन करतात. आता या पद्धतीने स्मार्ट गुंतवणूकदार होता येते. पण तुम्हाला अधिक स्मार्ट गुंतवणूकदार कसे होता येईल? कोणतीही स्मार्ट गोष्ट जशी तंत्रज्ञानाला जोडलेली आहे, तसे तुम्हीही तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन ‘व्हेरी स्मार्ट’ गुंतवणूकदार होऊ शकाल. याबद्दल सविस्तर माहिती देताहेत एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.
पहिली पायरी
म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर स्टॉकब्रोकिंगचे अॅप डाउनलोड करणे होय. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल, तर तुम्ही तुमचा गुंतवणूक प्रवास अॅपवर झटपट अकाउंट उघडून करू शकता आणि किमान ब्रोकरेज शुल्कासारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. गुंतवणूक आणि ट्रेडिंगसाठी मोबाइल अॅप वापरण्याचा फायदा म्हणजे तुम्ही येता-जाता बाजाराचा माग ठेवू शकता.
दुसरी पायरी
एकदा अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही एखाद्या रुल-बेस्ड इन्व्हेस्टमेंट इंजिनसारखे डिजिटल सोल्युशन वापरून बघू शकता आणि त्याद्वारे तुमची पहिली गुंतवणूक करू शकता. रुल-बेस्ड इन्व्हेस्टमेंट इंजिन काही नियमांच्या आधारे स्टॉक्सची शिफारस करते. यात मानवी पूर्वग्रह टाळले जातात. यामुळे जोखीम किमान पातळीवर राहते आणि मोबदला जास्तीत-जास्त मिळवता येतो.
तिसरी पायरी
अत्यंत स्मार्ट गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने चढण्याची तिसरी पायरी म्हणजे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ उभा करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये पैसा गुंतवण्यासाठी डिजिटल ब्रोकर्सच्या ब्रोकिंग अॅप्सशी एकात्मीकरण करता येईल असा वेगळा थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म वापरणे होय. आधुनिक गुंतवणूक उत्पादने तुम्हाला कमी खर्चातील, दीर्घकालीन पोर्टफोलिओ तयार करण्याची मुभा देतात. इक्विटीजमध्ये गुंतवणूक करण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी हा एक आहे.
चौथी पायरी
स्टॉकब्रोकिंग अॅप्स वापरण्याचा आणखी एक लाभ म्हणजे बाजाराबाबत सातत्याने दक्ष राहता येते. दररोजच्या कामांमध्ये बाजाराचा माग ठेवणे आव्हानात्मक होऊ शकते पण अॅपद्वारे महत्त्वाच्या घटनांचे अॅलर्टस् (इशारे) प्राप्त होत असतील, तर तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय करण्यात मदत होऊ शकते. अॅलर्टसचा वापर चातुर्याने केला, तर ते तुम्हाला अद्ययावत ठेवून नफा कमावण्यात मदत करू शकतात.
पाचवी पायरी
अखेरची पायरी म्हणजे डिजिटल ब्रोकर्स गुंतवणुकीचे शिक्षण देणारे प्लॅटफॉर्म्सही पुरवतात. हे प्लॅटफॉर्म्स म्हणजे वित्तीय बाजारांबद्दलचे सर्वसमावेशक मार्गदर्शन असते. नव्याने गुंतवणूक करायला लागलेल्यांपासून ते प्रस्थापित गुंतवणूकदारांपर्यंत कोणीही या प्लॅटफॉर्मवर जॉइन होऊ शकते आणि भांडवली बाजारात पैसा गुंतवण्याच्या मार्गांचे शिक्षण घेऊ शकते. आपण व्यवसायाच्या मुलभूत तत्त्वांपासून ते ट्रेडिंगच्या व्यूहरचनांपर्यंत बाजाराची कार्यपद्धती येथे पूर्णपणे शिकू शकतो.
या काही साध्या पायऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही ‘व्हेरी स्मार्ट’ गुंतवणूकदार होऊ शकता.