नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ राज्यांमधील निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, मेघालय, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता राजकीय रणधुमाळीला वेग येणार आहे. उत्तर प्रदेश वगळता अन्य चार राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये १४ जानेवारीला आचारसंहिता लागू होणार आहे. या पाचही राज्यांचे निकाल १० मार्च रोजी लागणार आहेत.
निवडणुकीचे वेळापत्रक असे
उत्तर प्रदेश
एकूण ७ टप्प्यात मतदान
मतदान – १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ०३ मार्च आणि ०७ मार्च
पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि झारखंड
१४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान
निकाल
१० मार्च
अशी आहे सद्यस्थिती (एकूण जागा आणि पक्षीय बलाबल)
उत्तर प्रदेश
एकूण जागा ४०३
भाजप – ३२५, समाजवादी पार्टी – ४७, बहुजन समाज पार्टी १९, काँग्रेस ७, इतर ५
पंजाब
एकूण जागा ११७
भाजप ३, काँग्रेस ७७, आप २०, अकाली दल १५, इतर २
उत्तराखंड
एकूण जागा ७०
भाजप ५७, काँग्रेस ११, इतर २
गोवा
एकूण जागा ४०
भाजप १७, काँग्रेस १३, म. गोमांतक ३, गोवा फॉरवर्ड ३, इतर
मणिपूर
एकूण जागा ६०
भाजप २१, काँग्रेस २८, एनपीपी ०४, एनपीएफ ०४, इतर ३