मुंबई – जर्मनीची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने जारी केलेला स्कूटरचा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. लोकांची उत्सुकता न ताणता कंपनीने आगामी मॅक्सी स्कूटर C400GT च्या अनावरणाच्या तारखेचा खुलासा केला आहे. ही स्कूटर १२ ऑक्टोबरला भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
C400GT स्कूटर ची किंमत जवळपास पाच लाख रुपये असण्याची शक्यता असून, भारतीय बाजारात ती प्रीमियम स्कूटर सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीने एक लाखाची आगाऊ रक्कम घेऊन बुकिंग सुरू केली आहे. भारतात अनावरण झाल्यानंतर ही स्कूटर सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट १२५ आणि अप्रिलिया एसएक्सआर १६० च्या सेगमेंटच्या स्पर्धेत येणार आहे. भारतीय बाजारात या स्कूटरची थेट स्पर्धा कोणत्याही दुचाकीशी नसेल. नंतर होंडा कंपनी भारतात फोर्जा ३५० दुचाकी सादर करू शकते. मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
स्कूटरचे फिचर्स
C400GT ची पूर्ण मॅक्सी स्कूटरची बॉडी किट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक लांब विंडस्क्रीन, पूलबॅक हँडलबार, एक मोठे सीट, ड्युएल फुटरेस्ट, फूल एलईडी लाइटिंग, की लेस इग्निशन, हिटेड ग्रिप्स, हिटेड सीट, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टीम आणि एक ब्लू टूथ इनबेल्ड इन्स्ट्रूमेंट क्लस्टरचा समावेश आहे.