नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 5G च्या रोल-आउट दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ऑक्टोबर महिन्यासाठी 4G गती चाचणीचे आकडे जारी केले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ सरासरी 4G डाउनलोड स्पीडसह अपलोड स्पीडमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जिओच्या सरासरी 4जी डाउनलोड स्पीडमध्ये 1.2 एमबीपीएसची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात स्पीड 20.3 एमबीपीएस तर सप्टेंबर महिन्यात 19.1एमबीपीएस होता.
सरासरी डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन-आयडिया) यांच्यात निकराची लढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऑक्टोबरमध्ये एअरटेल चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 15 एमबीपीएसहोता तर Vi (Vodafone-Idea) 14.5 एमबीपीएस होता. दोन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्यापासून त्यांच्या गतीमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. पण रिलायन्स जिओचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड एअरटेल आणि वी च्या तुलनेत 5 एमबीपीएस पेक्षा जास्त आहे.
रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात सरासरी 4G अपलोड स्पीडमध्ये प्रथम क्रमांक गाठला. कंपनीने या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये 6.2 एमबीपीएस स्पीडसह आपले स्थान कायम ठेवले आहे. वी 4.5 एमबीपीएस स्पीडसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याचवेळी एअरटेलच्या अपलोड स्पीडमध्ये सातत्याने घट होत आहे. ऑक्टोबरमध्ये एअरटेलचा सरासरी 4G अपलोड स्पीड चिंताजनक 2.7 एमबीपीएस वर पोहोचला. एअरटेलचा अपलोड स्पीड जिओच्या निम्म्याहून कमी झाला आहे.
4G Mobile Speed Upload Download TRAI Report