मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील एक महत्त्वाचा घोटाळा उघड झाला आहे. युनियन बँकेसह अन्य बँकांनी तब्बल ४० हजार कोटी रुपयांची संपत्ती अवघ्या १ रुपयामध्ये विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व प्रकरण डीएचएफएल प्रकरणाशी संबंधित आहे. आणि या प्रकरणाची सुनावणी सध्या एनसीएलएटी न्यायालयात सुरू आहे. ही धक्कादायक बाब याच न्यायालयात उघड झाली आहे. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून न्यायालयाने युनियन बँकेसह अन्य बँकांना फटकारले आहे.
युनियन बँक आणि इतर बँकांनी ४० हजार कोटी रुपयांची संपत्ती पिरामल हाऊसिंगला अवघ्या एक रुपयामध्ये दिली. या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या कपिल व धिरज वाधवान यांना दिल्लीला नेण्यात आले आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार असून सीबीआय त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे. याप्रकरणी वाधवान बंधू तसेच एफडी आणि एनसीडी धारकांनी पिरामल हाऊसिंग आणि बँकांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
विशेष म्हणजे यापुर्वी डीएचएफएलचे कपिल वधवान आणि धिरज वधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या संशयितांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली.
वास्तविक पाहता ज्यांच्या नावे खाती काढण्यात आली होती, त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आले. कपिल आणि धिरज वधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित मनी लॉन्ड्रिगच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
डिसेंबर 2018 पर्यंत डीएचएफएलने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 539.40 कोटी रुपयांचे अनुदान असलेली 88,651 खोटी कर्ज प्रकरणं करण्यात आली. 2007 ते 2019 या दरम्यान खोट्या कर्ज खात्यांच्या माध्यमातून 14,046 कोटी रुपयांची 2.60 लाख खोटी गृह कर्ज खाती तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही खाती मुंबईतील बांद्रा येथील अशा शाखेत काढण्यात आली जी बँक कधीच अस्तित्वातच नव्हती, असे शिवायचे म्हणणे असून आता वधवान बंधूंच्या दिल्ली येथील चौकशीतून आणखी काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
40 Thousand Crore Property Sale in only 1 Rupees Fraud NCLT Court Union Bank of India CBI