विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्मार्ट टीव्ही आता बंगल्यांपासून झोपडपट्टीपर्यंत येऊन पोहोचला आहे. ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे अनेक कंपन्या यात उतरल्या आणि स्वस्त किमतीतील टीव्ही मार्केटमध्ये आले. मात्र तरीही योग्य किंमतीचा टीव्ही निवडताना ग्राहकांचा गोंधळ उडतो. मात्र कमी किंमतीत मोठ्या स्क्रीनचा टीव्ही खरेदी करायचा असेल आणि काही सूचत नसेल तर ही बातमी तुमच्या जास्त कामाची आहे. आपण २० हजारांपेक्षा कमी किंमतीचे पण ४० इंच स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही जाणून घेऊया.
Blaupunkt GenZ
किंमत : १५,९९९ रुपये
Blaupunkt GenZ हा एक जबरदस्त आणि स्वस्त अश्या स्मार्ट टीव्हींपैकी एक आहे. या टीव्हीचा डिस्प्ले ४० इंचाचा आहे. यात अमेझॉन प्राईम, युट्यूबसारखे ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी एक्सेस देण्यात आला आहे. याशिवाय टाव्हीमध्ये दोन स्पिकर मिळणार आहेत. ते जबरदस्त साऊंडचा अनुभव देतात.









