इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मागील वर्षी एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आता त्या तरुणाला त्रिपुरा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण खोवाई जिल्ह्यातील असून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या खटल्यात फिर्यादीच्या वतीने एकूण 35 साक्षीदार हजर करण्यात आले होते.
एका ऐतिहासिक निकालात त्रिपुरा न्यायालयाने कालीचरण याला चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तपास अधिकारी बिद्येश्वर सिन्हा यांनी आपला अहवाल सादर केल्यानंतर जिल्हा न्यायालय आणि विशेष लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा न्यायाधीश शंकरी दास यांनी दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. खटल्यात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.
विशेष म्हणजे, गृह विभागाच्या 2020 च्या अहवालानुसार, सप्टेंबर 2020 पासून महिलांविरोधातील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 10 महिन्यांत एकूण 207 जणांना अटक करण्यात आली. याच कालावधीत महिलांवरील एकूण 240 गुन्ह्यांपैकी 128 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, 2010 मध्ये त्रिपुरामध्ये देशातील सर्वाधिक 46.5 टक्के गुन्हेगारी दर होता. तसेच 2017 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये राज्य 14 व्या क्रमांकावर होते.
4 Year old Girl Rape and murder Case Suspect Sentence Death