मुंबई – शेअर बाजारातून पैसे कमवण्यात यशस्वी होण्यासाठी संयमाने विचारपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे. कारण ब्राइटकॉम ग्रुपमध्ये वर्षभरापूर्वी ज्यांनी गुंतवणूक केली होती ते सर्व आज श्रीमंत झाले असते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सची किंमत 1,705 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अवघ्या 4 रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब पालटले आहे.
दि. 4 नोव्हेंबर 2020 पर्यंत, ब्राइटकॉम समूहाच्या एका शेअरची किंमत 4.18 रुपये होती. यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी 75.40 रुपये झाले. या परिस्थितीत गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरवातीस या कंपनीच्या शेअरमध्ये कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर ते १८.०३ लाख रुपये झाले असते. या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी कंपनीचे शेअर्स 90.55 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर होते.
सप्टेंबर संपलेल्या तिमाहीनंतर, कंपनीच्या प्रवर्तकांकडे 22.40 टक्के आणि उर्वरित 77.60 टक्के लोकांकडे होते. 1.07 लाख लोकांकडे कंपनीचे 80.83 कोटी शेअर्स आहेत. यापैकी 1.05 लाख भागधारकांनी केवळ 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली आहे. केवळ 683 भागधारक आहेत ज्यांचे भांडवल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ब्राइटकॉम ग्रुप डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करतो. कंपनी डिजिटल डिजिटल मार्केटिंगशी संबंधित एजन्सी आणि इतर कंपन्यांना सेवा पुरवते.