मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या चार ग्रामपंचायती झाल्या मालामाल! मिळाला तब्बल कोट्यवधींचा कर

by Gautam Sancheti
जानेवारी 7, 2023 | 5:24 am
in राज्य
0
IMG 20230105 WA00271

 

विठ्ठल ममताबादे, उरण
रायगड जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत.  जवाहरलाल नेहरु पोर्टस प्रशासनाकडून (जेएनपीए) ग्रामपंचायतींना कर मिळाल्याने आता ग्रामपंचायत हद्दीतील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. उरणच्या तत्कालिन जेएनपीटी तथा आत्ताच्या जेएनपीए बंदरा कडून स्थानिक ग्रामपंचायतींना येऊ असलेल्या मालमत्ता कराचा प्रश्न काही अंशी सुटला असून यातील ११ पैकी चार ग्रामपंचायतींना मालमत्ता करापोटीच्या धनादेशांचे वाटप जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

यावेळी उपाध्यक्ष उन्मेश वाघ, जयवंत ढवळे, मनिषा जाधव यांच्यासह ग्रामपंचायतींच्या वतीने जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींच्या समन्वय समितीचे निमंत्रक तुकाराम कडू,जसखारच्या सरपंच काशिबाई ठाकूर, जासईचे सरपंच संतोष घरत, सोनारी सरपंच पुनम कडू, नवघरच्या सरपंच सविता मढवी, आणि करळच्या सरपंच अनिता तांडेल यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.

साडेनऊ कोटींचे धनादेश
जेएनपीए बंदराच्या माध्यमातून तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींना मालमत्ता कराची रक्कम येणे बाकी आहे. या मागणीच्या निमित्ताने जेएनपीटीच्या कार्यालयांवर जप्तीच्या कारवाया देखील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. या मालमत्ता कराबाबतचा एक दावा मुंबईच्या हाय कोर्टामध्ये सुरू होता. त्या दाव्याच्या अनुषंगाने जेएनपीए आणि स्थानिक कर घेऊ पाहणाऱ्या ११ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतींनी एक सामंजस्य करार जेएनपीए सोबत नुकताच केला होता. त्यानुसार या सहा ग्रामपंचायतींना यापुर्वी म्हणजेच २०२० सालापर्यंत दिलेली रक्कम वजा करून रक्कम देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार जासई, नवघर जसखार आणि करळ सावरखार या चार ग्रामपंचायतींना तब्बल साडेनऊ कोटींच्या घसघशित रकमेच्या धनादेशांचे वाटप जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायतीला तब्बल ४ कोटी
सर्वाधिक म्हणजेच ४ कोटी ८३ लाख ५५ हजार ६५९ रूपयांच्या धनादेश करळ सावरखार ग्रामपंचायतला देण्यात आला आहे. तर त्या खालोखाल २ कोटी ३६ लाख ६९ हजार ७७२ रूपायांचा धनादेश जसखार ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे, अशी माहिती तुकाराम कडू यांनी दिली. जासई ग्रामपंचायतीला १ कोटी ८३ लाख ७२ हजार ४७७ रूपायांचा धनादेश देण्यात आला असून नवघर ग्रामपंचायतीला ५९ लाख ८२ हजार ७७० रूपायांचा धनादेश अदा करण्यात आला आहे.

आणखी सहा ग्रामपंचायतींना मिळणार
११ पैकी ६ ग्रामपंचायतींनी जेएनपीए सोबत केलेला समझोता करार मा. मुंबई उच्च न्यायालयात सादर केला होता. त्याला न्यायालयाने २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मान्यता दिली होती त्यानुसारच या मालमत्ता कराच्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर या सहा ग्रामपंचायतींनी बँक गॅरंटी म्हणून जमा केलेली रक्कम ही त्यांना लवकरच मिळणार आहे. या सहा ग्रामपंचायतींपैकी सोनारी आणि फुंडे ग्रामपंचायतीला मुदत ठेव म्हणून ठेवण्यात आलेली रक्कम पुढील काही दिवसात अदा होण्याची शक्यता आहे. उर्वरीत ५ ग्रामपंचायतींना देखील जेएनपीएने लवकरात लवकर मालमत्ता कराचे पैसे देऊन ग्रामपंचायतींच्या विकासाला हातभार लावावा अशी मागणी यावेळी जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींच्या समन्वय समितीचे निमंत्रक तुकाराम कडू यांनी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्याकडे केली आहे.

जेएनपीएने सहा ग्रामपंचायतीचा कर दिला आहे. तरी ग्रामपंचायतीचा हक्काचा असलेला मालमत्ता कर लवकरात लवकर मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
– महेश बालदी, आमदार, उरण विधानसभा मतदार संघ.
जेएनपीए प्रशासनाने चार ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर वाटप केला असून न्यायालयाचा आदेश आल्यानंतर उर्वरित ग्रामपंचायतींना देखील मालमत्ता कराचे वाटप करण्यात येणार आहे.
– जयवंत ढवळे, व्यवस्थापक, जेएनपीए

4 Grampanchayats Got Crore rupees Tax
Rural Development JNPT JNPA Port

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेल्वे तिकीटाबाबत तक्रार केली आणि बँक खात्यातून गायब झाले थेट ६४ हजार; कसं काय?

Next Post

नाशिक जिल्ह्यातील ‘ही’ बाजार समिती आर्थिक उत्पन्नात राज्यात तिसरी तर उत्तर महाराष्ट्रात पहिली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन…केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, महाजन यांची विशेष उपस्थिती

सप्टेंबर 9, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

सप्टेंबर 9, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
संमिश्र वार्ता

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

सप्टेंबर 9, 2025
bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
accident 11
क्राईम डायरी

अपघातांची मालिका सुरूच…. वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन पादचारींचा मृत्यू

सप्टेंबर 9, 2025
Untitled 6
मुख्य बातमी

अखेर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा…हिंसाचारानंतर निर्णय

सप्टेंबर 9, 2025
Next Post
Pimpalgaon

नाशिक जिल्ह्यातील 'ही' बाजार समिती आर्थिक उत्पन्नात राज्यात तिसरी तर उत्तर महाराष्ट्रात पहिली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011