इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारांमध्ये अनेक प्रकारचे चढ-उतार होत असतात. आता फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या समभागांनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 35,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. Flomik Global Logistics चे शेअर्स अवघ्या 3 वर्षात 35 पैशांवरून 128 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 216.30 रुपये आहे. त्याच वेळी, फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 4.74 रुपये आहे.
Flomik Global Logistics चे शेअर्स 28 मार्च 2019 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 35 पैशांच्या पातळीवर व्यवहार करत होते. 24 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 128 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 36,470 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने तीन वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक चालू ठेवू दिली असेल तर सध्या ही रक्कम 3.6 कोटी रुपये झाली असती.
Flomik Global Logistics चे शेअर्स 26 मार्च 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4.92 रुपये होते. 24 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 128 रुपयांवर बंद झाले. जर 1 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 28 लाख रुपये झाले असते. म्हणजेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 27 लाखांचा थेट फायदा झाला असता. कंपनीच्या समभागांनी गेल्या 1 वर्षात 2500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
(महत्त्वाची सूचना – शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा)