सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा

by India Darpan
मार्च 20, 2021 | 12:56 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 2021320164750

मुंबई – राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. काढणीला आलेली पिकेच या पाऊस आणि गारपीटीत लक्ष्य ठरली आहेत.
वाशीम जिल्ह्यातल्या मंगरूळ, कारंजा, मालेगाव, रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्यात काल रात्री वादळी -वारा,तसंच गारा पडल्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकासह फळबागा आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं. जिल्ह्यातला वीज पुरवठा मध्यरात्री उशिरापर्यंत बंद होता.
वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी, आर्वी आणि कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चणा, गहू पपई, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून ठेवलेला गहू, चणाही पावसामुळे भिजला. तालुका प्रशासनाच्या सूचनेवरून सध्या महसूल आणि कृषी विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीच्या सर्वेक्षणासह पंचनामे केली जात आहेत.
बुलढाणा जिल्हयातल्या बुलडाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा,शेगाव, संग्रामपूर, शेगाव सह मोताळा सिंदखेड राजा या तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी  विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला.
परभणीत सोनपेठ तालुक्यातल्या उक्कडगाव ते वडगावच्या परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस झाला तर गंगाखेड-परळी या रस्त्यावरच्या  सोनपेठ हद्दीतल्या उक्कडगाव पासून, नैकोटवाडी, करम, ते गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावरील वडगावपर्यंत वादळी वारे, गारांचा पाऊस पाऊस सुरू होता.
नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तडाखा दिला आहे. काढणीला आलेला उन्हाळ कांदा, काढणीसाठी सज्ज असलेली द्राक्ष आणि अन्य पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – भटकूया आनंदे – किल्ले मार्कंडेय

Next Post

देवळा तालुक्यात या गावात गारपीट; वीज पडून बकरी ठार

India Darpan

Next Post
IMG 20210320 WA0214

देवळा तालुक्यात या गावात गारपीट; वीज पडून बकरी ठार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011