इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरची चांगलीच मागणी वाढली आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून अनेक वाहन चालकांचा इलेक्ट्रिक स्कूटर कडे कल वाढलेला दिसून येतो. सहाजिकच अनेक वाहन कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत.
नोएडा स्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Wroley ने एकाच वेळी तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर – Wroley Mars, Platina आणि Posh लॉन्च केले आहेत. परवडणाऱ्या रेंजमध्ये येणाऱ्या या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये उत्तम रेंज आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटर्सची किंमत ₹ 66,000 पासून सुरू होते आणि ती 90 किमी पर्यंतची रेंज देते.
या तिन्ही स्कूटरमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट अलार्म, पार्किंग मोड, अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या तिन्ही लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, ज्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही.
दिल्ली सरकारने 59 टक्के इलेक्ट्रिक वाहनधारकांना सबसिडी दिली असून Wroley मार्स किंमत आणि तपशील
तिघांपैकी ही सर्वात स्वस्त स्कूटर आहे आणि तिची किंमत ₹66,000 एक्स-शोरूम आहे. स्कूटर एकूण 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 40v 30amp बॅटरी आहे. तसेच या कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर फुल चार्ज केल्यावर 75 किमी पर्यंत धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
दुसऱ्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 73,700 रुपये आहे. स्कूटर एकूण 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 60v 30amp बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमी पर्यंत धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
Wroley पॉश ही कंपनीची प्रीमियम स्कूटर आहे ज्याची किंमत 78,100 रुपये एक्स-शोरूम आहे. स्कूटरचा लूक साधारणतः व्हेस्पाची आठवण करून देणारा आहे. सदर स्कूटर एकूण 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 60v 30amp बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 90 किमी पर्यंत धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतका आहे.