नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण पथकाने रिकाम्या आयशर टेम्पोतून बेकायदा वाहतूक होणारी लाखोंची दारू जप्त केली आहे. या कारवाईत चालकास गजाआड करुन पथकाने टेम्पोसह मद्य असा सुमारे २८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.टेम्पोच्या कॅबीन मधील चोर कप्यातून वाहतूक केले जात होती. हंसराजभाई मोहनभाई ठाकूर (रा.चलथान ता.पलसाना,सुरत) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
राज्यात विक्रीस बंदी असलेली व गोवा राज्यात निर्मीत दारूची जिह्याच्या सिमाभागातून बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवणसह अन्य भरारी पथकेही कामाला लागली होती. कळवणच्या पथकाने सोमवारी (दि.५) वनारवाडी (ता.दिंडोरी) शिवारातील अक्राळे फाटा येथील पेट्रोल पंपासमोर वाहन तपासणी केली असता आयशरमधून चोरी छुपी वाहतूक केला जाणारा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. एमएच ४८ एवाय ३६६३ या रिकाम्या आयशर टेम्पोची पथकाने तपासणी केली असता चालक कॅबीनच्या मागच्या बाजूस व वाहनाच्या खालच्या बाजूस संशय येणार नाही अश्या ठिकाणी चोर कप्पा आढळून आला. या कप्यात गोवा निर्मीत व राज्यात विक्रीस बंदी असलेली विविध ब्रॅण्डच्या विदेशी दारूची १४३ बॉक्स तसेच किंगफिशर बिअरची दहा बॉक्स असा मद्यसाठा मिळून आला. चालकास ताब्यात घेत या कारवाईत आयशरसह मद्यसाठा असा सुमारे २७ लाख ७० हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कळवण विभागाचे निरीक्षक एस.के.सहस्त्रबुध्दे,दुय्यम निरीक्षक एम.बी.सोनार,आर.एम.डमरे,जवान डी.एन.आव्हाड,एम.जी.सातपुते,व्ही.टी.कुवर व चालक पी.एम.वाईकर आदींच्या पथकाने केली. सदर कारवाईसाठी अ विभाग भरारी पथकाचे निरीक्षक व्ही.एस.कोसर्डीकर,सिमा तपासणी नाका करंजाळी तथा भरारी पथक क्रं.३ आदीं पथकांनी सहकार्य केले.