नाशिक – पंधरावा वित्त आयोगांमधून नाशिक जिल्ह्यासाठी २८ नागरी आरोग्य संस्था मंजूर केल्या आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा या प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य उपकेंद्र या संस्था मार्फत राबविले जाते. तसेच शहरी भागामध्ये यामध्ये नगरपालिका तसेच महानगरपालिका अंतर्गत आरोग्य उपकेंद्र राबवली जातात व सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा पुरविण्यात येतात २०२२-२३ मध्ये पंधराव्या वित्त आयोगामध्ये नगरपालिका क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील एकूण २८ नागरी आरोग्य संस्था मंजूर झाल्या असून यामध्ये
देवळाली कॅम्प ४
नांदगाव शहर ३
इगतपुरी ३
मनमाड २
भगूर १
येवला २
चांदवड २
निफाड १
त्रंबकेश्वर १
दिंडोरी १
देवळा १
सटाणा २
सुरगाणा १
सिन्नर २
पेठ १
कळवण १
अशा एकूण २८ ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र लवकरच कार्यान्वित होणार असून त्याची मंजुरी प्राप्त झाली आहे. शहरांबरोबर ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील गावांची लोकसंख्या वाढली असून अनेक ठिकाणी नगरपंचायती कार्यरत आहेत. परंतु त्यांच्याकडे आरोग्य सेवा देणे कामी दवाखाने नाहीत. त्यामुळे ही दुर्लक्षित राहिलेली नागरी भागातील लोकसंख्येला ही आरोग्य सेवा उपलब्ध होईल. या ठिकाणी शासनाच्या नागरी धोरणानुसार कंत्राटी पद्धतीने एक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, स्टाफ नर्स, शिपाई क्लीनिकल स्टाफ अशा प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध असणार असून आरोग्य सेवेतील विविध नागरी सेवा उपलब्ध असणार आहेत. यामध्ये नियमित लसीकरण सर्वेक्षण गरोदर मातांची तपासणी तसेच असंसर्गिक आजार याविषयी महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेचे काम केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाधिकारी डॉ राहुल हडपे यांनी दिली आहे.