पणजी – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना अनेक ठिकाणी ऑक्सिजनविना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आता गोव्यामध्येही कोरोनाचा प्रसार वाढल्याने कोविड रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. यादरम्यान गोव्यातील बांबोळी येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी बुधवारी पहाटे दोन ते सहा वाजेदरम्यान २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बांबोळीच्या रुग्णालयाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी भेट देऊन ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे जाहीर केले होते. ऑक्सिजन सिलिंडर वेळेत पोहोचत नसल्याची बाब त्यांनी मान्य केली होती. त्यावरून त्यांनी ऑक्सिजन पुरवठादारांना इशाराही दिला होता.
मंगळवारी रात्री बांबोळी रुग्णालयात १२२ क्रमांकाच्या वॉर्डात ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांना व्हॉट्सअॅपवरून संदेश पाठवून मदतीची विनंती केली होती. मात्र तरीही चार तासात २६ रुग्ण दगावले. मध्यरात्रीनंतर ऑक्सिजनचा तुटवडा का निर्माण होत आहे व मृत्यू का होत आहेत, याची न्यायालयाने चौकशी करावी, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारीच म्हटले होते.
https://twitter.com/ANI/status/1392320344002686977