ललितपूर (उत्तर प्रदेश) – येथे अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडीलांसह अनेक नातेवाईक व प्रतिष्ठीत व्यक्ती अशा एकूण २५ जणांनी बलात्कारा केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मुलीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या भयानक प्रकरणात सपा आणि बसपाच्या जिल्हाध्यक्षांचा देखील समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. यातील भयानक प्रकार म्हणजे या मुलीने खुद्द वडीलांवर बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आता या पिडीत मुलीला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाईल.
पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, माझे वडील आईला नशा करायला लावून माझ्या सोबत गेली पाच वर्षे गलिच्छ काम करतात. याबाबत आईने तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पाच नातेवाईकांनी माझे लैगिंक शोषण केले तसेच जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. या तक्रारीनंतर सपा आणि बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
पिडीत मुलगी वयाच्या १२ वर्षाची (म्हणजे इयत्ता सहावीत) असताना वडिलांनी तिला शेतात नेऊन तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. आईने तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर वडिलांनी आईला औषधे देऊन वारंवार बेशुद्ध केले आणि मुलीला नेहमी त्रास देत राहिले. यानंतर, वडील तिला दररोज शाळेतून एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागले. जिथे वेगवेगळे इसम तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिले. याशिवाय अनेक नातेवाईकांनीही तिच्यावर बलात्कार केला. पिडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.