सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सटाणा येथील कांदा उत्पादक शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्यावर विविध २१ चित्र रेखाटत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहे. या कांद्यावरील चित्रात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वेगवेगळ्या मुद्रा साकारल्या आहे. मोरे यांनी कांदा उत्पादक शेतकरी संकटातून बाहेर काढावे यासाठी मोदी यांना दिर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना वाढदिवसानिमित्ताने केली आहे. देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. पण, कांद्यावरील मोदींचे साकारलेले २१ चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे.