सिकर (राजस्थान) – जिल्ह्यातील खिरवा गावात गेल्या २१ दिवसात २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा दफनविधी नियमांचे उल्लंघन केल्यानंतर हे मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे.
गावात १५ एप्रिल ते ५ मेपर्यंत कोरोना संसर्गामुळे फक्त चार लोकांचा मृत्यू झालेला आहे, असे धिकार्यांचे म्हणणे आहे. गावातील एका व्य्यक्तिचा कोरोनामुळे गुजरातमध्ये मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह २१ एप्रिलला खिरवा गावात आणण्यात आला. त्याच्या अंत्ययात्रेत जवळपास १५० लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नाही. मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून आला होता. परंतु लोकांनी प्लॅस्टिकच्या पिशवीतून मृतदेह काढण्यात आला. यादरम्यान अनेकांनी त्याला स्पर्शही केला होता.
लक्ष्मणगढचे उपविभागीय अधिकारी कलराज मीणा म्हणाले, २१ पैकी फक्त तीन किंवा चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्येष्ठ लोकांचा अधिक मृत्यू झाला आहे. तरीही आम्ही ज्या कुटुंबांमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांपैकी १४७ जणांचे नमुने घेतले आहेत. यामुळे कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला किंवा नाही याबाबतची स्थिती स्पष्ट होऊ शकेल.
सिकरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय चौधरी यांनी स्थानिक पथकांकडून अहवाल मागविला आहे. अहवाल मिळाल्यानंतरच यावर काही बोलता येईल, असे ते म्हणाले. खिरवा काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या निवडणूक क्षेत्रात हे गाव येते. त्यांनीच सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. एका मृतदेहाला स्पर्श केल्यानंतर पूर्ण गाव संकटात आले आहे, असे ट्विट त्यांनी केले होते. काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ट्वट डिलिट केले होते.