मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान सभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर आदी मान्यवरांनीही बैस यांचे स्वागत केले.