मुंबई – कोणत्याही शासकीय अथवा खासगी कार्यालयात काम करणारे अधिकारी असो की कर्मचारी किंवा कामगार यांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळते. परंतु त्याचबरोबर काही सार्वजनिक आणि शासकीय सुट्ट्या देखील असतात. त्या दिवशी कामकाज बंद असते. येत्या वर्षात या सुट्ट्या कमी झाल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त ३१ दिवस शिल्लक आहेत. वर्षाअखेरीस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने दिसत असून काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीसाठी प्रत्येकजण आपले प्लॅन आखात असेल. यासोबत सुट्ट्यांच्या दृष्टीनेही नवीन वर्ष सर्वांसाठी महत्वाचे असते. मात्र 2022 या वर्षांत सुटट्या घटल्याचं दिसत आहे. काही सुट्टया रविवारी आल्यामुळे निराशा झाली आहे. रविवार वगळता 2022 मध्ये 17 सुट्ट्या आहेत. तर नव्या वर्षात 52 रविवार आले आहेत. म्हणजेच 2022 मध्ये अशा एकूण 69 सुट्ट्या मिळणार आहेत.
२०२२ मधील सरकारी सुट्यांची यादी अशी
जानेवारी
दि. 26 जानेवारी, बुधवार – ‘प्रजासत्ताक दिन तर दि 2, 9, 16, 23, 30 रोजी रविवार आहेत.
फेब्रुवारी
दि.19 फेब्रुवारी शनिवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर 6, 13, 20, 27 रोजी रविवार आहेत.
मार्च
दि. 1 मार्च, मंगळवार – महाशिवरात्री तर 18 मार्च, शुक्रवार – धुलीवंदन आणि दि. 6,13, 20, 27 रोजी रविवार आहेत.
एप्रिल
दि.2 एप्रिल, शनिवार – गुडीपाडवा तर 14 एप्रिल, गुरुवार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, तसेच 15 एप्रिल, गुरुवार – गुड फ्रायडे आहे.आणि दि. 3,10,17, 24 रोजी रविवार आहेत.
मे
दि. 3 मे, मंगळवार – अक्षय तृतीया, रमजान ईद तर 16 मे, सोमवार – बुद्धपौर्णिमा आणि दि. 1, 8,15, 22, 29 रोजी रविवार आहेत.
जून
एकही सरकारी सुट्टी नाही. मात्र 5,12,19,26 रोजी रविवार आहेत.
जुलै
एकही सरकारी सुट्टी नाही मात्र दि. 3,10,17, 24, 31 – रविवार आहे
ऑगस्ट
दि.9 ऑगस्ट, मंगळवार – मोहरम, 15 ऑगस्ट, सोमवार – स्वातंत्र्य दिन, 16 ऑगस्ट, मंगळवार – पारशी नववर्ष, 31 ऑगस्ट, बुधवार – श्रीगणेश चतुर्थी तर दि. 7,14,21,28 – रविवार
सप्टेंबर
एकही सरकारी सुट्टी नाही, 4,11,18,25 – रविवार .
ऑक्टोबर
5 ऑक्टोबर, बुधवार – दसरा, 24 ऑक्टोबर, सोमवार – लक्ष्मीपूजन, 26 ऑक्टोबर, बुधवार- दिवाळी पाडवा व भाऊबीज तर 2,9,16,23,30 – रविवार
नोव्हेंबर
8 नोव्हेंबर, मंगळवार – गुरु नानक जयंती तर 6,13,20,27 – रविवार आहे.
डिसेंबर
14,11,18,25 – रविवार
रविवारी आलेल्या सरकारी सुट्या अशा
10 एप्रिल – राम नवमी
1 मे, – महाराष्ट्र दिन
2 ऑक्टोबर – गांधी जयंती
9 ऑक्टोबर – ईद
25 डिसेंबर – ख्रिसमस.