मुंबई – गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षी कोविडच्या कहरामुळे अनेक स्टार्सचे निधन झाले, तर यंदा काही सेलिब्रिटींना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अनेक तरूण स्टार्संनी यावर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जगाला अखेरची सलामी दिली.
पुनीत राजकुमार
तरूण कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याने शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला. 46 वर्षीय पुनीतच्या निधनाने त्याचे चाहते आणि सहकारी स्टार्स शोक करत आहेत.
सिद्धार्थ शुक्ला
दोन महिन्यापुर्वी सिद्धार्थ याच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. 2 सप्टेंबर 2021 रोजी घडलेली ही घटना अफवा ठरावी, अशी प्रत्येकाची इच्छा होती, पण तसे झाले नाही. बिग बॉस 13 चा विजेता ठरलेल्या तरूण सिद्धार्थने वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
राज कौशल
अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती, दिग्दर्शक, निर्माता आणि स्टंट दिग्दर्शक राज कौशल यांनी 30 जून 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला. 50 वर्षीय कौशल यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.
अमित मिस्त्री
अमित मिस्त्री यांनी चित्रपटांसोबतच थिएटर आणि टीव्हीमध्येही आपली ओळख निर्माण केली होती. अमित यांचे 23 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
राजीव कपूर
अभिनेते राजीव कपूर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. राजीव यांना 9 फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरेखा सिक्री
16 जुलै 2021 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुरेखा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सरोज खान
बॉलीवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सरोज यांनी 3 जुलै रोजी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.