टोरंटो – अलीकडच्या काळात कॅनडा आणि अमेरिकेमध्ये (युएसए) अनेक घटना घडत आहेत. कॅनडाच्या ओंटारियो येथे रविवारी रात्री ट्रक चालकाने पाकिस्तानी वंशाच्या कुटुंबाला चिरडून टाकले. या प्रकरणी आधी नथॅनिएल वेल्टमन या २० वर्षीय चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, आता त्याच्यावर दहशतवादाशी संबंधित आरोप लावण्यात आले आहेत.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या प्रकाराला घृणा व दहशतवादी कृत्य म्हटले. या ड्रायव्हरवर दहशतवादाशी संबंधित गुन्हे दाखल गेले आहे. यापूर्वी त्याच्यावर चार लोकांच्या हत्येचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा आरोप आहे. तर आता या घटनेत मुलगा आणि वृद्ध महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला असून एका नऊ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक अल्पवयीन मुलगी यांचा समावेश आहे. वास्तविक, संशयित आरोपी आणि मुस्लिम कुटुंबामध्ये यापूर्वी कधीही संपर्क झाला नव्हता. मात्र कॅनेडियन पोलिसांनी या प्रकारास मुस्लिम कुटुंबाला नियोजित लक्ष्य केल्याचे म्हटले आहे.
