मुंबई – राज्य सरकारने आणखी २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मंत्रालयातील मोठ्या अधिकार्यांसह काही जिल्हाधिकार्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकार्यांमध्ये दीपककुमार मिणा, ओ. पी. गुप्ता, राहुल रेखावार, रुबल अग्रवाल, दौलत देसाई आदी अधिकार्यांचा समावेश आहे.
बदल्या केलेल्या अधिकार्यांची यादी पुढीलप्रमाणे ः
१) दीपककुमार मिणा – यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
२) ओ. पी. गुप्ता – यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवपदावरून वित्त विभागात प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
३) विकासचंद्र रस्तोगी – यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदावरून उच्च व तंत्रशिक्षण विभागस मंत्रालय, प्रधान सचिवपदावर नियुक्ती.
४) इंद्रा मल्लो – यांची एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबईच्या आयुक्त पदावरून सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती.
५) अजित पाटील – यांची सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथून सहसचिव पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई येथे नियुक्ती.
६) रुबल अग्रवाल – यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून आयसीडीसी नवी मुंबई येथे नियुक्ती.
७) दौलत देसाई – यांची कोल्हापूर जिल्हाधिकारीपदावरून वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी मुंबईत बदली.
८) रुचेश जयवंशी – यांची हिंगोली जिल्हाधिकारीपदावरून महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी बदली
९) संजय यादव – यांची मुंबईतील एमएसआरडीसी येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी बदली.
१०) शैलेश नवाल – यांची अमरावती जिल्हाधिकारीपदावरून मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती.
११) आर. एच. ठाकरे – यांची नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती.
१२) जे. एस. पापळकर – यांची अकोला जिल्हाधिकारीपदावरून अकोला महापालिका आयुक्तपदी नियुक्ती.
१३) जी. एम. बोडके – यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदावरून हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती.
१४) राहुल रेखावार – यांची अकोल्याच्या एमएस अॅसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
१५) रवींद्र बिनवडे – यांची जालनाच्या जिल्हाधिकारीपदावरून थेट पुण्याच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती
१६) पवनीत कौर – यांची पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण आयुक्तपदावरून अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली.
१७) विजय राठोड – यांची जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली.
१८) निमा अरोरा – यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली.
१९) आंचल गोयल – यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली.
२०) डॉ. बी. एन. पाटील- यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली.