लखनऊ – सर्वसाधारणपणे तरुण एकमेकाला मारतात किंवा त्याचे किस्से ऐकायला मिळतात. मात्र, दोन तरुणींनी भररस्त्यात एकमेकाला बदडल्याचे दुर्मिळ मानले जाते. असाच काहीसा प्रकार येथे पहायला मिळाला. एका बार रेस्टॉरंटच्या बाहेर भररस्त्यात दोन तरुणींनी एकमेकाला जोरदार चोपले. लाथाबुक्क्यांनी एकमेकाला मारहाण केली. विशेष म्हणजे या सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याची जौरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकार ज्या दोन तरुणींनी केला त्याची माहिती समोर आली आहे. एका युवकाच्या त्या आजी आणि माजी गर्लफ्रेंड आहेत. बॉयफ्रेंड आपलाच आहे असे सांगत दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. आता या व्हायरल व्हिडिओने मात्र अनेकांचे मनोरंजन होत आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/pawan_pawant/status/1453054940184784909