विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तरीही अनेक सरकारी विभागांमध्ये भरती सुरू झाली आहे. आपण सरकारी नोकरी शोधत असाल तर आता चांगली संधी आहे. कारण शासकीय अधिकृत वेबसाइटवर सरकारी नोकऱ्यांशी संबंधित अपडेट्स देण्यात येतात.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (भेल) भारतातील प्रकल्प साइटवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित कार्यकाळ नियुक्तीच्या आधारावर अनुभवी अभियंता आणि पर्यवेक्षकांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. काही पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे 4 सप्टेंबरपासून सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवार BHELच्या अधिकृत वेबसाइट careers.bhel.in किंवा pser.bhel.com वर अधिसूचना तपासू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ( एनआयडी ) मध्य प्रदेश या संस्थेने वरिष्ठ अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार एनआयडीच्या भरती 2021 साठी 30 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. नमूद पदांसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 1 सप्टेंबर 2021 रोजी 34 वर्षे आहे. तसेच ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) प्रवर्गातील उमेदवारासाठी वरची वयोमर्यादा 3 वर्षांनी शिथिल आहे. एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट आहे. उमेदवारांनी फक्त 30 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत किंवा संस्थेच्या वेबसाइट www.nidmp.ac.in च्या ऑनलाइन भरती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.