नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असलेल्या फॅब या खासगी कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. कंपनीत पत्र्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक पत्रे तुटून दोन कामगार मोठ्या उंचीवरुन खाली जमिनीवर कोसळले. या अपघातात दोन्ही कामगार ठार झाले आहेत. आज रात्री आठ वेज्या सुमारास ही दुर्घटना घडवी. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण करण्यात आले. रुग्णमित्र निवृत्ती पाटील यांनी मदतकार्य केले. या कामगारांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मोहम्मद सानू खान (वय २८) आणि मोहम्मद अनास (वय २१) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. तर अधिक तपास वाडीवऱ्हे पोलिस करीत आहेत.