इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘द कश्मीर फाइल्स’नंतर चित्रपटाची टीम आणखी दोन चित्रपट एकत्र बनवण्याचा विचार करत आहे. विवेक अग्निहोत्री, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी हे दिग्दर्शक इतिहासात दडलेल्या अशाच ऐतिहासिक घटनांवर चित्रपट बनवणार आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
तरण आदर्शने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, “द काश्मीर फाइल्सची टीम आणखी दोन चित्रपट बनवणार आहे. #TheKashmirFiles च्या अभूतपूर्व यशानंतर, निर्माते अभिषेक अग्रवाल, विवेक रंजन अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी भारतीय इतिहासातील अप्रकाशित कथांवर आधारित आणखी दोन चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.“
ट्विटसोबत तरणने एक अधिकृत व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “ग्लोबल ब्लॉकबस्टर काश्मीर फाईल्समधून इतिहास रचण्याच्या आणि मोठ्या पडद्यावर उत्तम कथा सांगण्याच्या उत्कटतेने, तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, विवेक रंजन अग्निहोत्री, पल्लवी जोशी पुन्हा मानवतेच्या प्रामाणिक कथा सांगण्यासाठी एकदा एकत्र आले आहेत. अधिक माहिती लवकरच दिली जाईल. भारतीय इतिहासातील अकथित सत्यांचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा“
https://twitter.com/taran_adarsh/status/1513376006911905796?s=20&t=O21SJ3hLl7xxltmvF4naDg
विवेक रंजन अग्निहोत्रीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने आता २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा कमी बजेटचा चित्रपट एसएस राजामौली यांच्या भव्यदिव्य आरआरआर चित्रपट चित्रपटगृहात आला असतानाही टिकून आहे. महामारीच्या काळात गंभीर विषयावर बनवलेला हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता. अनेक लोकं चित्रपटाला चुकीचे सांगत आहेत. पण विरोधापेक्षा चित्रपटाच्या समर्थनातच जास्त लोक समोर आले आहेत. चित्रपटाच्या कथेमुळे अनेक राज्यांमध्ये तो करमुक्त करण्यात आला. ज्यामध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, गोवा, त्रिपुरा आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.
अनेक बॉलिवूड स्टार्सनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाचे वर्णन एक चळवळ असे केले आहे. त्याला हा चित्रपट खूप आवडला असून नवीन दिग्दर्शकांनी या चित्रपटातून खूप काही शिकायला हवे, असे त्याने म्हटले आहे.