रविवार, डिसेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिल्लीत स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी या १८०० लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

ऑगस्ट 13, 2023 | 4:49 pm
in संमिश्र वार्ता
0
Narendra Modi e1666893701426


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट २०२३ ला ऐतिहासिक लाल किल्यावरुन ७७ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. 12 मार्च 2021ला अहमदाबाद मध्ये साबरमती आश्रमातून पंतप्रधानांनी याचा प्रारंभ केला होता. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल. ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

विशेष अतिथी
लाल किल्यावर होणाऱ्या समारंभासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या सुमारे १८०० जणांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ‘जन भागीदारी’ या दृष्टीकोनाला अनुसरून हा उपक्रम आहे. या विशेष अतिथीमध्ये ६६० पेक्षा जास्त व्’हायब्रंट व्हिलेजेस’चे ४०० सरपंच, शेतकरी उत्पादक संघटना योजनेतील २५० व्यक्ती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमधले प्रत्येकी ५० व्यक्ती, सेन्ट्रल विस्टा प्रकल्प, नवे संसद भवन, सीमावर्ती भागातली रस्ते बांधणी, अमृत सरोवर, हर घर जल योजना यासाठी काम करणारे ५० श्रमयोगी (बांधकाम मजूर), ५० खादी कामगार, प्राथमिक शिक्षक, परिचारिका, मच्छिमार वर्गातले प्रत्येकी ५० जणांचा समावेश आहे. यापैकी काही विशेष अतिथी दिल्लीमधल्या आपल्या मुक्कामात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील व संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेतील. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशामधल्या ७५ जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक वेशात लाल किल्यावरच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

‘सेल्फी पॉइंटस’
केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉइंटस’ १२ महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा यांचा यात समावेश आहे.

‘सेल्फी पॉइंटस’मध्ये, जागतिक आशा : लस आणि योग; उज्वला योजना; अंतराळ सामर्थ्य; डिजिटल इंडिया; स्कील इंडिया; स्टार्ट अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नव भारत; प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन अभियान या योजनांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर १५-२० ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या १२ पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात व MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

ई–निमंत्रण
सर्व अधिकृत निमंत्रणे आमंत्रण पोर्टल (http://www.aamantran.mod.gov.in/) द्वारे पाठवण्यात आली आहेत. या पोर्टल द्वारे 17,000 ई–निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.

1800 people invited as special guests for Independence Day celebrations in Delhi
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाण्यातील महानगरपालिका हॅास्पिटलमध्ये फक्त वरचा दरवाजा उघडा; १७ रुग्ण दगावल्याच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड संतप्त

Next Post

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या आयुष्यावर चित्रपट; मनसेने ट्वीट करत दिला हा इशारा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
seema haider

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या आयुष्यावर चित्रपट; मनसेने ट्वीट करत दिला हा इशारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011