विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत देशात दररोज कोट्यवधी लोक संक्रमित होत आहेत, परंतु एका आठवड्यापासून देशातील १८० जिल्ह्यांत कोणतेही नवीन रुग्ण आढळला नाही, असा केंद्र सरकारचा दावा आहे. तसेच कोरोना साथीच्या परिस्थितीबद्दल मंत्र्यांच्या गटाच्या २५ व्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील १८ जिल्ह्यात १४ दिवस आणि ५४ जिल्ह्यात २१ दिवसांत नवीन रुग्ण आढळलेला नाही. तसेच रेड झोनबाहेर ३२ जिल्हे असे आहेत की येथे गेल्या २८ दिवसांपासून कोणासही कोरोना संसर्ग झालेला नाही.
सध्या देशात आयसीयूमध्ये ४ लाख ८८ हजार रुग्ण आहेत. तर १ लाख ७० हजार रुग्ण व्हेंटिलेटर आणि ९ लाख रूग्ण ऑक्सिजन सपोर्ट बेडवर आहेत. बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, एका व्यक्तीला लसीचे दोन डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी प्रथम दुसरा डोस घ्यावा. राज्यांनाही यास प्राधान्य देण्यास सांगितले आहे. आता देश एका दिवसात 25 लाख नमुने तपासू शकतो.
एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंह म्हणाले की, लहान शहरे आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. या भागात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत परंतु इथल्या कमकुवत आरोग्य सेवांमुळे देशाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते. तसेच महाराष्ट्र , कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश , तामिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान , गुजरात आणि मध्य प्रदेशात संसर्ग वाढीचा दर आणखी वाढता असून गेल्या सात दिवसांपासून सतत वाढत आहे.
बंगळूरू , गंजम, पुणे, दिल्ली, नागपूर, मुंबई, एर्नाकुलम, लखनऊ, कोझिकोड, ठाणे, नाशिक, मलप्पुरम, त्रिशूर, जयपूर, गुडगाव, चेन्नई, तिरुअनंतपुरम, चंद्रपूर, कोलकाता, पलक्कड मधील सर्वाधिक कार्यरत रुग्ण असून ज्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहे. या बैठकीत गटाच्या अध्यक्ष डॉ. व्ही.के. पॉल यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या प्रभावी आरोग्य व्यवस्थापनासाठी रुग्णालयाची पायाभूत सुविधा वाढविण्याच्या प्रयत्नांविषयी सूचना केल्या.