मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्तासंघर्ष काही केल्या शांत व्हायला तयार नाही. दररोज टीकेच्या झोडी दोन्ही बाजूने उठत असताना ठाकरे गटाने आता १६ आमदारांच्या अपात्रतेाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने आग्रही भूमिका घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा सत्ता संघर्ष संदर्भातील निर्णय आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पुढची रणनीती ठरवली जात आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तातडीने ठाकरे गटाचे आमदारांनी आज विधान भवन येथे जाऊन हा निर्णय तातडीने घ्यावा,या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत जोडून निवेदन दिले. अध्यक्ष अनुपस्थित असल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हे निवेदन देण्यात आले.
सुनिल प्रभू म्हणाले…
लवकरात लवकर अध्यक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यावा अशा मागणीचे पत्र दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनात आल्यानंतर लवकरच त्यांना सुद्धा पुन्हा एकदा विधानभवनात येऊन आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाईल,असं सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात आले. सुनील प्रभू म्हणाले,‘सर्वोच्च न्यायालयाची प्रत आणि निवेदन आम्ही विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे दिले आहे.
ही आहे अपेक्षा
प्रभू पुढे म्हणाले की, न्यायलायाने जे म्हटलं आहे त्यावर लवकर निर्णय द्या ही विनंती आम्ही केली आहे. जे काही पत्रात सर्वोच्च न्यायालयाने दिलं आहे तेच आम्ही सगळं दिलं आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्याची आम्ही त्यांना विनंती केली आहे. १५ दिवसांनी निर्णय दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे. जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तोच आम्ही त्यांना दिला आणि लवकर निर्णय द्यावी ही विनंती केली आहे. सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे ते बंधनकारक आहे आणि तसं आम्ही काम करू.
हा कालावधी अमर्याद असू शकत नाही
विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबतची कारवाई ही रिजनेबल टाइम कालावधीत करावी असे म्हटले आहे. मात्र, हा रिजनेबल टाइम म्हणजे काय, यावरून चर्चा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी हा कालावधी अमर्याद असू शकत नाही, असे म्हटले आहे.
https://twitter.com/Marathi_Rash/status/1658010914468270087?s=20
16 MLA Disqualification Thackeray Group Narhari Zirwal