नवी दिल्ली – आसामच्या नागाव येथे एका चहाच्या मळ्यात तब्बल १६ फूट लांब किंग कोब्रा सापडला. जवळपास २० किलो वजनाचा हा कोब्रा पकडण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना खूप परिश्रम करावे लागले.
येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांनी हा कोब्रा पाहिला, आणि त्यांना धडकीच भरली. त्यांनी लागलीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. वन विभागाने देखील तातडीने हालचाल करत चहाच्या मळ्याकडे धाव घेतली. हा विषारी साप पकडण्यासाठी या कर्मचाऱ्यांना मळ्यातच उतरावे लागले.








