शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘तारक मेहता’ शोला १५ वर्षे पूर्ण… निर्माते मोदींनी केली ही मोठी घोषणा

जुलै 31, 2023 | 2:32 pm
in मनोरंजन
0
Asit Kumar modi tmkoc e1687240520941

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात अत्यंत लोकप्रिय असतात. त्यातही काही मालिका या कितीही काळ लोटला तरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात. यातच पहिल्या क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. काळाच्या ओघात अनेक कलाकार ही मालिका सोडून गेले, काही कलाकारांनी निर्मात्यांवर आरोप केले. दिशा वाकानी अर्थात दयाबेन पुन्हा एकदा मालिकेत येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तशा बातम्या देखील येत आहेत.

या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, टप्पू यासारख्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. सहा वर्षांपासून दयाबेन फेम दिशा वकानी तारक मेहतापासून लांब आहे. ती पुन्हा या मालिकेत येणार अशा बातम्यांना उधाण आले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी यावेळी ही माहिती दिली आहे. दयाबेन म्हणून प्रसिद्ध असलेली दिशा वकानी पुन्हा तारक मेहतामध्ये दिसणार आहे. मी खात्रीनं सांगतो की, दयाबेन लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल, असेही ते म्हणाले आहेत. यानंतर चाहत्यांनी दयाबेनवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वात सर्वाधिक टीआरपी घेणारी मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ही मालिका नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेचा विषय राहिली आहे. त्यातील पात्रे ही चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय आहेत. या मालिकेची प्रेक्षकसंख्याही मोठी आहे. त्या पात्रांशी चाहत्यांचे एक प्रकारचे भावनिक नाते तयार झाले आहे. त्यामुळे यातील कोणतेही पात्र मालिकेत न दिसल्यास चाहत्यांची निराशा होते.

२०१७ पासून मॅटर्निटी लिव्हवर असल्याचे सांगून दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चाहते बऱ्याच दिवसांपासून आपल्या आवडत्या अभिनेत्रीची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दयाबेन मालिकेतून गेल्यापासून प्रेक्षकांनी देखील खूपच तीव्रपणे आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ke 15 saal ka jashn manaiye humare saath.

Dekhiye #TaarakMehtaKaOoltahChashmah ka 1-hour special episode, Saturday – 29th raat 8:30 baje, sirf Sony SAB par. pic.twitter.com/W4KEegwHAP

— Sony SAB (@sabtv) July 28, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना सौंदर्य पाहून खासदारकी दिली… संजय शिरसाटांचा आरोप…

Next Post

मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल… हे मार्ग बंद… आताच जाणून घ्या…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल... हे मार्ग बंद... आताच जाणून घ्या...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011