पुणे – कोरोनाच्या सावटात शैक्षणिक संस्था सुरू झाल्या असतानाच आता विविध ठिकाणचे वृत्त समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शाळेत ५५ विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचे वृत्त ताजे आहे. त्यातच आता पुण्यातील एका विद्यापीठातील १३ विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे विद्यार्थी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांना या वृत्तास दुजोरा दिला आहे. डॉ. दवे म्हणाले की, या सर्व विद्यार्थ्यांना कुठलेही लक्षणे नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विद्यापीठाच्यावतीने सर्व ती काळजी घेतली जात आहे. सर्व नियमांच कसोशीने पालन केले जात आहे. अन्य विद्यार्थ्यांचीही चाचणी केली जाईल, असे दवे यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1475324897022734339?s=20