इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या निकालात मुली पुन्हा एकदा अव्वल ठरल्या आहे. मुलीचा निकाल ९४.५८ तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के लागला आहे. एकुण ९ विभागात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून तो ९६.७४ टक्के आहे.
राज्यातील नऊ विभागात पुणे ९१.३२, नागपूर ९०.५२, छ. संभाजीनगर ९२.२४, मुंबई ९२.९३, कोल्हापूर ९३.६४, अमरावती ९१.४३, नाशिक ९१.३१, लातूर ८९.४६ तर कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे. त्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे.
या परिक्षेस राज्यातील नऊ विभागातून १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १३,०२,८४३ विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहे. त्याची टक्केवारी ९१.८८ आहे.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून ४२ हजार ३८८ रिपीटरने नोंदणी केली. ४२ हजार २४ बसले. यापैकी १५ हजार ८२३ पास झाले. एकूण उत्तीर्ण ३७.५४ टक्के निकाल लागला आहे. ७ हजार ३१० दिव्यांग विद्यार्थी नोंदणी. ७ हजार २५८ विद्यार्थी परीक्षेला बसले. ६ हजार ७०५ पास झाले. निकाल टक्केवारी ९२.३८ टक्के इतकी आहे.