इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
शाखा निहाय विद्यार्थी संख्येचा तपशील शाखा विज्ञान (Science) ७,६८,९६७ नोंदणी झालेले विद्यार्थी. शाखा कला (Arts) ३,८०,४१० नोंदणी झालेले विद्यार्थी, शाखा वाणिज्य (Commerce) ३,१९,४३९ नोंदणी झालेले विद्यार्थी, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) (Vocational) ३१,७३५ नोंदणी झालेले विद्यार्थी, टेक्निकल सायन्स (ITI) ४,४८६ नोंदणी झालेले विद्यार्थी, एकूण विद्यार्थी संख्या १५,०५,०३७ इतकी आहे.