मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १२ वीच्या बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत थेट उत्तर छापण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार असल्याचे बोलले जात आहे. इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक ३ मध्ये कवितेववर आधारित होता. यातील उप प्रश्नामध्ये उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्याचा हा घोळ आहे. दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाला. या घोळानतर बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे….